Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या भावात आणखी घसरण

By admin | Updated: January 3, 2015 01:51 IST

मागणीअभावी शुक्रवारी सोन्याचा भाव ७५ रुपयांनी घसरून २७,०२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. दुसरीकडे जागतिक बाजारात तेजीचा कल होता.

नवी दिल्ली : नववर्षात सलग दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात ठोस मागणीअभावी शुक्रवारी सोन्याचा भाव ७५ रुपयांनी घसरून २७,०२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. दुसरीकडे जागतिक बाजारात तेजीचा कल होता.तथापि, चांदीचा भाव मात्र ताज्या मागणीने ४०० रुपयांनी वधारून ३६,६०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून आले.व्यापाऱ्यांनी सांगितले की, आभूषण निर्माते व किरकोळ व्यापाऱ्यांकडून मागणी कमी झाल्याचा सोन्याच्या भावावर दबाव राहिला. काल सोन्याच्या भावात १०० रुपयांची घट झाली होती.देशांतर्गत बाजार कल निश्चित करणाऱ्या सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.६ टक्क्याने वाढून १,१८८.४६ डॉलर प्रतिऔंस राहिला. चीनपासून रशियापर्यंत अनेक देशांत घसरणीचा कल असताना अमेरिकी बाजारात सुधारणा नोंदली गेली. याचाही स्थानिक बाजारपेठेवर दबाव राहिला. चांदीचा भाव १.६ टक्क्याने वाढून १५.९१ डॉलर प्रतिऔंसवर आला.तिकडे तयार चांदीचा भाव ४०० रुपयांच्या सुधारणेसह ३६,६०० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ३०० रुपयांनी वाढून ३६,४७० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांनी वाढून खरेदीसाठी ६०,००० रुपये व विक्रीसाठी ६१,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)