Join us

सोने पुन्हा ६०० रुपयांनी, तर चांदी १००० रुपयांनी महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:35 IST

शनिवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची काही अंशी सुधारणा झाली

जळगाव : सोने-चांदीच्या भावात तेजी सुरूच असून, शनिवारी पुन्हा सोन्याच्या भावात ६०० रुपये प्रति तोळ्याने वाढ होऊन ते ३८ हजार ६०० रुपयांवर पोहोचले. चांदीच्याही भावात एकाच दिवसात एक हजार रुपये प्रति किलोने वाढ होऊन ती ४५ हजारांवर पोहोचली आहे.अमेरिका व चीनने सोन्याची खरेदी वाढविल्याने, तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे दोन महिन्यांपासून सोने-चांदीचे भाव चांगलेच वाढत आहेत.

शनिवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची काही अंशी सुधारणा झाली, तरी सोने ६०० रुपये प्रति तोळा तर चांदी एक हजार रुपये प्रति किलोने वाढली. विदेशात वाढलेली या धातूंची खरेदी व विदेशी वायदे बाजारातून निघणारे वाढीव भाव, यामुळे भारतातही भाव वाढत आहेत.