Join us

दोन दिवसांच्या तेजीनंतर सोने आपटले

By admin | Updated: February 4, 2015 01:44 IST

सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर आज सोन्याचा भाव १८० रुपयांनी कोसळून २८,२७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला

नवी दिल्ली : सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर आज सोन्याचा भाव १८० रुपयांनी कोसळून २८,२७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्मात्यांच्या खरेदीत घट झाल्याने हा कल दिसून आला. तथापि, चांदीचा भाव ४५० रुपयांच्या सुधारणेसह ३८,४५० रुपये प्रतिकिलो राहिला.जागतिक बाजारात घसरणीचा कल राहिला. परिणामी स्थानिक सराफ्यात आभूषण निर्माते व रिटेलर्स यांच्या मागणीत घट नोंदली गेली. न्यूयॉर्क येथे सोन्याचा भाव ०.७२ टक्क्यांनी घटून १,२७३.८० डॉलर प्रतिऔंस झाला. तयार चांदीचा भाव ४५० रुपयांनी उंचावून ३८,४५० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ५० रुपयांनी वाढून ३८,००० रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ६३,००० रुपये व विक्रीकरिता ६४,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)