नवी दिल्ली : येथील सराफा बाजारात सोने १८0 रुपयांनी वाढून २८,७३0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. त्याचप्रमाणे चांदी ३५0 रुपयांनी वाढून ४0,६00 रुपये किलो झाली. जागतिक बाजारांपैकी प्रमुख असलेल्या सिंगापुरात सोने 0.९ टक्क्यांनी वाढून १,१७३.५१ डॉलर प्रतिऔंस झाले. दिल्लीत ९९.५ टक्के शुद्धतेचे ससोने २८,५८0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. साप्ताहिक डिलिव्हरीची चांदी ३६0 रुपयांनी वाढून ४0,५८0 रुपये किलो झाली.
सोने महिन्याच्या उच्चांकावर
By admin | Updated: January 6, 2017 03:21 IST