Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोने एक महिन्याच्या उच्चांकावर

By admin | Updated: November 3, 2016 06:08 IST

जागतिक बाजारातील तेजी आणि ज्वेलरांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे दिल्लीत बुधवारी सोने २५0 रुपयांनी वाढून ३0,९५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजी आणि ज्वेलरांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे दिल्लीत बुधवारी सोने २५0 रुपयांनी वाढून ३0,९५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. हा सोन्याचा एक महिन्याचा उच्चांक ठरला. सिंगापूर बाजारात सोने 0.३५ टक्क्यांनी वाढून १,२९२.३0 डॉलर प्रति औंस झाले. स्थानिक बाजारात ज्वेलरांनी लग्नसराईची मागणी पूर्ण करण्यासाठी खरेदी केल्यामुळे सोने वाढले. दिल्लीत ९९.९ टक्के व ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव २५0 रुपयांनी वाढून अनुक्रमे ३0,९५0 रुपये आणि ३0,८00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. ३ आॅक्टोबरनंतरची ही सर्वोच्च पातळी ठरली. त्या दिवशी सोने ३१,२00 रुपयांवर होते. काल सोने ५0 रुपयांनी वाढले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव मात्र, १२0 रुपयांनी घसरून २४,४00 रुपये प्रति नग झाला.