Join us

सोन्याची आयात मेमध्ये १०.४७ टक्क्यांनी वाढली

By admin | Updated: June 17, 2015 03:32 IST

सोन्याची आयात मे महिन्यात १०.४७ टक्के वाढून २.४२ अब्ज डॉलरची झाली. सोन्याची घटलेली किंमत आणि रिझर्व्ह बँकेने हटविलेले

नवी दिल्ली : सोन्याची आयात मे महिन्यात १०.४७ टक्के वाढून २.४२ अब्ज डॉलरची झाली. सोन्याची घटलेली किंमत आणि रिझर्व्ह बँकेने हटविलेले काही निर्बंध यामुळे ही आयात वाढली. सोन्याची आयात गेल्या वर्षी मेमध्ये २.१९ अब्ज डॉलरची होती.यावर्षी एप्रिलमध्ये सोन्याची आयात ७८.३३ टक्क्यांनी उसळी घेऊन ३.१३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली होती. सोन्याची आयात वाढताच चालू खात्यावरील तोट्यात वाढ होते.गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चालू खात्यावरील तोटा कमी होऊन सकल देशी उत्पादनाच्या (जीडीपी) १.९ टक्क्यांइतका (१८ अब्ज डॉलर) होता. हा तोटा गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ३.१ टक्के होता. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार चालू खात्यावरील तोटा हा योग्य पायरीवर मर्यादित असला तरी सोन्याच्या वाढत्या आयातीमुळे नवे प्रश्न निर्माण होऊ शकतात. नोव्हेंबर २०१४ मध्ये रिझर्व्ह बँकेने वादग्रस्त ८०.२० योजना रद्द केली होती. या योजनेनुसार आयात सोन्याचा किमान २० टक्के निर्यात कर घेतल्यानंतरच त्याच्या नव्या खेपेच्या आयातीला परवानगी दिली जायची. सोने घसरले; चांदी तेजीतसराफा बाजारात मंगळवारी मिश्र कल दिसून आला. सोन्याचा भाव १५ रुपयांनी घसरून २७,१६५ रुपये तोळा झाला. चांदीचा भाव मात्र २३0 रुपयांनी वाढून ३७,२८0 किलो झाला. दागिने निर्मात्यांनी खरेदीत हात आखडता घेतल्यामुळे सोन्याच्या भावाला फटका बसला.