मुंबई : भारतीयांच्या जिव्हाळ््याचा विषय असलेल्या, परंतु अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने डोकेदुखी असलेल्या सोन्याच्या आयातीमध्ये गेल्या आर्थिक वर्षात १६ टक्के घट झाली असल्याचे दिसून आले आहे. यानुसार, गेल्या आर्थिक वर्षात भारतात ९२६ टन सोन्याची आयात झाली.उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१५-१६ या आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातील १६ टक्क्यांची घट झाली आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अर्थात मार्च २०१६ मध्ये तर मार्च २०१५ मध्ये झालेल्या १२५ टन सोन्याच्या आयातीच्या तुलनेत अवघी १८ टन आयात झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सोने व दागिन्यांवर अबकारी कर लागू केल्याची घोषणा केल्यानंतर व्यापाऱ्यांनी केलेल्या संपाचा फटका प्रामुख्याने सोन्याच्या आयातीला बसला आहे. कच्चे तेल आणि सोन्याची आयात या दोन प्रमुख घटकांवर देशाचे परकीय चलन प्रामुख्याने खर्ची पडते. परतुं, गेल्या वर्षभरामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली घसरण आणि सोन्याच्या आयातीमध्ये झालेली घट यामुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलनाही बचत झाली आहे. (प्रतिनिधी)
सोने आयातीत १६ टक्के घट
By admin | Updated: April 14, 2016 01:12 IST