नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात लग्नसराईच्या खरेदीने सोन्याचा भाव ७० रुपयांनी वधारून २७,३०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तथापि, चांदीचा भाव ३७,८५० रुपयांवर कायम राहिला. व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील मजबूत स्थितीने लग्नसराईच्या खरेदीला बळ मिळाले. गुरुवारी दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला होता. लंडन येथे सोन्याचा भाव १,१८६.६० डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भाव ०.३१ टक्क्याने वाढून १६.३४ डॉलर प्रतिऔंस झाला. दुसरीकडे तयार चांदीचा भाव ३७,८५० रुपयांवर कायम राहिला, तर चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव मागणीअभावी २०० रुपयांनी कोसळून ३७,८१५ रुपये प्रति किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५६,००० रुपये आणि विक्रीकरिता ५७,००० रुपये प्रति शेकडा झाला. सोने सध्या अस्थिर आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याचा भावात ७० रुपयांची वाढ; चांदीचा भाव मात्र स्थिर
By admin | Updated: May 9, 2015 00:33 IST