Join us

सोने महागले; चांदी मात्र घसरली

By admin | Updated: July 14, 2015 02:18 IST

राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याचा भाव २0 रुपयांनी वाढून २६,३५0 रुपये तोळा झाला. त्याच वेळी चांदीचा भाव मात्र १00 रुपयांनी घसरून ३५,६५0 रुपये किलो झाला.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याचा भाव २0 रुपयांनी वाढून २६,३५0 रुपये तोळा झाला. त्याच वेळी चांदीचा भाव मात्र १00 रुपयांनी घसरून ३५,६५0 रुपये किलो झाला. व्यापाऱ्यांनी सांगितले की, दागिने निर्मात्यांनी तुरळक प्रमाणात का होईना खरेदी केली. त्याचा लाभ सोन्याला झाला; मात्र जागतिक बाजारात नरमाईचा कल राहिल्यामुळे सोन्याची भाववाढ मर्यादित राहिली. सिंगापुरात सोने 0.८ टक्क्यांनी घसरून १,१५४.६0 डॉलर प्रति औंस झाले. सोने 0.६ टक्क्यांनी घसरून १५.४८ डॉलर प्रति औंस झाले. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २0 रुपयांनी वाढून अनुक्रमे २६,३५0 रुपये आणि २६,२00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. सोन्याच्या ८ ग्रॅम गिन्नीचा भाव मात्र आदल्या सत्राच्या पातळीवर २३,000 रुपये असा कायम राहिला. तयार चांदीचा भाव १00 रुपयांनी घसरून ३५,६५0 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १५0 रुपयांनी घसरून ३५,४६५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५३ हजार रुपये आणि विक्रीसाठी ५४ हजार रुपये प्रति शेकडा असा आदल्या दिवशीच्या पातळीवर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)