नवी दिल्ली : येथील सराफा बाजारात सोने ४00 रुपयांनी घसरून २८,८५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले आहे. २९ हजारांच्या खाली आलेल्या सोन्याचा हा २ महिन्यांतील नीचांक ठरला आहे. चांदी ५२५ रुपयांनी घसरून ४0,९७५ रुपये किलो झाली. जागतिक बाजारातील घसरण आणि स्थानिक पातळीवर घटलेली मागणी यामुळे सोने-चांदी घसरले. सिंगापूर येथील बाजारात सोने 0.४ टक्क्याने घसरून १,१९६.२४ डॉलर प्रति औंस झाले.
सोने घसरले ४00 रुपयांनी
By admin | Updated: March 11, 2017 00:24 IST