Join us

सोने ३७० रुपयांनी घसरले

By admin | Updated: May 26, 2016 02:02 IST

सोन्या-चांदीच्या भावात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. राजधानी दिल्लीत सोने ३७0 रुपयांनी घसरून २९,२00 रुपये तोळा झाले. हा सोन्याचा सहा आठवड्यांचा

नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या भावात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. राजधानी दिल्लीत सोने ३७0 रुपयांनी घसरून २९,२00 रुपये तोळा झाले. हा सोन्याचा सहा आठवड्यांचा नीचांक ठरला. चांदी ५0 रुपयांनी घसरून ३९,४५0 रुपये किलो झाली आहे. जागतिक बाजारांपैकी प्रमुख बाजार असलेल्या न्यूयॉर्कमध्ये सोने २१.३८ डॉलरनी अथवा १.७१ टक्क्यांनी घसरून १,२२६.९0 डॉलर प्रति औंस झाले. या घसरणीचा परिणाम स्थानिक बाजारावर दिसून आला. त्यातच ज्वेलर्सनी खरेदीत हात आखडता घेतला. या दुहेरी फटक्यामुळे सोने उतरले. (वृत्तसंस्था)