नवी दिल्ली : येथील सराफा बाजारात सोने १00 रुपयांनी घसरून २९,0५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. जागतिक बाजारातील नरमाईचा कल आणि स्थानिक ज्वेलरांनी कमी केलेली खरेदी, यामुळे ही घसरण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. चांदीही ३00 रुपयांनी घसरून ४0,९00 रुपये किलो झाली. सिंगापूर येथील बाजारात सोने 0.४५ टक्क्याने घसरून १,२२८.४0 डॉलर प्रति औंस झाले.
सोने १00 रुपयांनी उतरले
By admin | Updated: March 22, 2017 00:22 IST