Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोने महागले, चांदी घसरली

By admin | Updated: April 15, 2016 03:14 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात संमिश्र वातावरण असूनही स्थानिक बाजारात विवाहाच्या मोसमामुळे मागणी वाढल्याने दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोने ५० रुपयांनी वधारून २९२५० रुपये

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात संमिश्र वातावरण असूनही स्थानिक बाजारात विवाहाच्या मोसमामुळे मागणी वाढल्याने दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोने ५० रुपयांनी वधारून २९२५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. त्यातच औद्योगिक मागणी वाढल्याने चांदीसुद्धा ४५० रुपयांनी उसळून ३८,६५० रुपये प्रतिकिलोवर गेली. जागतिक बाजारात मात्र सलग तिसऱ्या दिवशी सोने घसरले. सिंगापूर बाजारात सोने १.१ टक्क्यांनी घसरून १२२९ अमेरिकी डॉलर्स प्रति औंस झाले. सात एप्रिल रोजी हा दर होता.