Join us

सोने उतरले, चांदी महागली

By admin | Updated: December 10, 2015 23:39 IST

जागतिक बाजारातील कमजोर मागणी आणि ज्वेलरांनी खरेदीकडे फिरविलेली पाठ यामुळे गुरुवारी सराफा बाजारात संमिश्र कल दिसून आला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर मागणी आणि ज्वेलरांनी खरेदीकडे फिरविलेली पाठ यामुळे गुरुवारी सराफा बाजारात संमिश्र कल दिसून आला. राजधानी दिल्लीत सोने ४0 रुपयांनी घसरून २५,८00 रुपये तोळा झाले. चांदी मात्र १00 रुपयांनी सुधारून ३४,३00 रुपये किलो झाली.व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारात काल मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. या महिन्याच्या अखेरपर्यंत अमेरिकी फेडरल रिझर्व्ह व्याजदरांत वाढ करण्याची शक्यता असल्यामुळे बाजारात विक्रीचा जोर राहिला. असे झाल्यास २00६ नंतर प्रथमच अमेरिकेत व्याजदर वाढतील.काल न्यूयॉर्क येथील बाजारात सोने प्रति औंस 0.२0 टक्क्याने घसरून १,0७२.५0 डॉलर झाले. त्यानंतर आज लंडन बाजारात सोने प्रति औंस 0.१२ टक्क्याने घसरून १,0७३.८0 डॉलर झाले. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ४0 रुपयांनी घसरून अनुक्रमे २५,८00 रुपये आणि २५,६५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. काल सोने ६५ रुपयांनी वाढले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव आदल्या सत्राच्या पातळीवर म्हणजेच २२,२00 रुपये असा कायम राहिला. दिल्लीत तयार चांदीचा भाव १00 रुपयांनी सुधारून ३४,३00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलेव्हरीच्या चांदीचा भाव मात्र १0 रुपयांनी घसरून ३४,३५0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ४८ हजार रुपये आणि विक्रीसाठी ४९ हजार रुपये प्रति शेकडा होता.असा आदल्या सत्राच्या पातळीवर कायम राहिला.