Join us

मागणी घटल्याने सोने 350 ने स्वस्त

By admin | Updated: October 28, 2014 01:34 IST

जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव मागणीअभावी 350 रुपयांनी घटून 27,45क् रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव मागणीअभावी 350 रुपयांनी घटून 27,45क् रुपये प्रति 1क् ग्रॅम झाला. चांदीचा भावही 35 रुपयांनी स्वस्त होऊन 38,2क्क् रुपये प्रतिकिलोवर आला. औद्योगिक संस्था व नाणो निर्मात्यांकडून पुरेशी मागणी न मिळाल्याने चांदीच्या भावात ही घसरण नोंदली गेली आहे.
बाजार विश्लेषकांच्या मते, सणासुदीच्या मागणीत घट व जागतिक बाजारात कमजोर स्थिती या पाश्र्वभूमीवर सराफ्यात घसरणीचा कल दिसून आला. गेल्या 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडवा व भाऊबीजनिमित्त बाजाराला सुट्टी होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्दिल्ली बाजारातच 99.9 व 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 35क् रुपयांनी घटून अनुक्रमे 27,45क् रुपये व 27,25क् रुपये प्रति 1क् ग्रॅम झाला. यात 125 रुपयांची घट झाली.