Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याची मागणी घटली; संप, कठोर नियमांचा फटका

By admin | Updated: August 12, 2016 03:48 IST

या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी १८ टक्क्यांनी घटून १३१ टनांवर आली. त्यामुळे जागतिक सुवर्ण परिषदेने यंदाच्या सोन्याच्या मागणीचा अंदाज १२ टक्क्यांनी

मुंबई : या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी १८ टक्क्यांनी घटून १३१ टनांवर आली. त्यामुळे जागतिक सुवर्ण परिषदेने यंदाच्या सोन्याच्या मागणीचा अंदाज १२ टक्क्यांनी घटवून ७५0 ते ८५0 टन केला आहे. जागतिक बाजारात मात्र यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी १५ टक्क्यांनी वाढून १,0५0 टनांवर गेली.किमतीतील मोठी वाढ आणि सरकारने कठोर केलेले नियम आणि सराफा व्यापाऱ्यांचा संप यामुळे मागणीत घट झाल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत सोन्याची मागणी १५९.८ टन होती. किमतीचा विचार करता यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी ८.७ टक्क्यांनी घटून ३५,५00 कोटी रुपयांवर आली. गेल्या वर्षी ती ३८,८९0 कोटी रुपये होती. जागतिक सुवर्ण परिषदेचे भारतातील व्यवस्थापक पीआर सोमसुंदरम यांनी सांगितले की, २0१६ च्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी १८ टक्क्यांनी घटून १३१ टन झाली. तसेच पहिल्या सहामाहीत ती३0 टक्क्यांनी घटून २४७.४ टनांवर आली आहे. गेल्या वर्षी ती ३५१.५ टन होती. ही घट लक्षात घेता यंदा संपूर्ण वर्षात सोन्याची मागणी ७५0 ते ८५0 टन इतकी राहण्याचा अंदाज आहे. सोमसुंदरम यांनी सांगितले की, सोने खरेदीसाठी पॅनकार्डची सक्ती, टीडीएस कपातीचा नियम, दागिन्यांवर लावण्यात आलेले उत्पादन शुल्क आणि ग्रामीण भागातील उत्पादनात झालेली घट याचा परिणामही सोन्याच्या मागणीवर झाल्याचे दिसून आले. या तिमाहीत दागिन्यांची मागणी १0.८ टक्क्यांनी घटून २६,५२0 कोटी रुपये झाली. २0१५ मध्ये ती २९,७२0 कोटी रुपये होती. (प्रतिनिधी)येथील सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या भाव १५५ रुपयांनी घसरून ३१,१२५ रुपये तोळा आणि तयार चांदीचा भाव ४00 रुपयांनी घसरून ४६,९५0 रुपये किलो झाला. जागतिक बाजारातही सोने घसरले. सिंगापूरमध्ये सोने 0.४ टक्क्याने घसरून १,३४१.५0 डॉलर प्रति औंस झाले. राजधानी दिल्लीत ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भावही १५५ रुपयांनी घसरून ३0,९७५ रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. काल सोने ३१0 रुपयांनी वाढले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव मात्र स्थिर राहिला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ३३0 रुपयांनी घसरून ४६,८३0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव एक हजार रुपयांनी घसरून खरेदीसाठी ७५ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७६ हजार रुपये प्रति शेकडा झाला.