Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्यात तेजी कायम, चांदीही उसळली

By admin | Updated: June 10, 2016 04:23 IST

परदेशात उठाव कायम असल्याने व स्थानिक व्यापाऱ्यांनी खरेदी चालविल्याने सोन्या-चांदीत तेजी कायम आहे.

नवी दिल्ली : परदेशात उठाव कायम असल्याने व स्थानिक व्यापाऱ्यांनी खरेदी चालविल्याने सोन्या-चांदीत तेजी कायम आहे. गुरुवारी सोने १० रुपयांनी वधारले, तर चांदी चक्क एक हजार रुपयांनी उसळली. सोन्याचे भाव १० रुपयांनी वाढल्याने, २९,१७० रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदी एक हजार रुपयांनी वधारल्याने चांदीचा भाव ४०,५०० रुपये प्रतिकिलो झाला. (प्रतिनिधी)