Join us
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर सोने जप्त ......

By admin | Updated: August 7, 2015 00:06 IST


विमानतळावर ६४२ ग्रॅम सोने जप्त
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी पहाटे एका प्रवाशाने अवैधरीत्या आणलेले ६४२ ग्रॅम सोने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. अटक केलेल्या प्रवाशाचे नाव एस. मोहम्मद असून तो दक्षिण भारतातील रहिवासी आहे. एस. मोहम्मद हा एअर अरेबियाच्या जी-९०४१६ या विमानाने शारजाह येथून नागपुरात आला होता. तपासणीदरम्यान सुटकेसच्या आतील भागातील एका कप्प्यात त्याने सोने लपविले होते. सीमा शुल्क विभागातर्फे त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.