Join us

सोने-चांदी तेजाळले

By admin | Updated: October 11, 2016 05:20 IST

सराफा बाजारातील चार दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला असून, राजधानी दिल्लीत सोने १७0 रुपयांनी वाढून ३0,४१0 रुपये तोळा

नवी दिल्ली : सराफा बाजारातील चार दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला असून, राजधानी दिल्लीत सोने १७0 रुपयांनी वाढून ३0,४१0 रुपये तोळा, तर चांदी ४५0 रुपयांनी वाढून ४२,७५0 रुपये किलो झाली. दागिने निर्माण आणि किरकोळ विक्रेत्यांनी जोरदार खरेदी केल्यामुळे भावात वाढ झाल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले. जागतिक बाजारातही सोने वाढल्याचे दिसून आले. सिंगापुरात सोने 0.४६ रुपयांनी वाढून १,२६३.४0 डॉलर प्रति औंस झाले. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १७0 रुपयांनी वाढून अनुक्रमे ३0,४१0 रुपये आणि ३0,२६0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव १00 रुपयांनी वाढून २४,४00 रुपये झाला. दिल्लीत तयार चांदीचा भाव ४५0 रुपयांनी वाढून ४२,७५0 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ५२0 रुपयांनी वाढून ४२,३८५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ७२ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७३ हजार रुपये प्रति शेकडा असा आदल्या सत्राच्या पातळीवर स्थिर राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)