Join us

सोने-चांदी सावरले

By admin | Updated: December 18, 2015 01:46 IST

अमेरिकी फेडरल बँकेने वाढविलेले व्याजदर आणि जवाहिऱ्यांनी केलेली खरेदी यामुळे सोने आणि चांदीची घसरण गुरुवारी थांबली. सलग तीन दिवस घसरण झाल्यानंतर सोने

नवी दिल्ली : अमेरिकी फेडरल बँकेने वाढविलेले व्याजदर आणि जवाहिऱ्यांनी केलेली खरेदी यामुळे सोने आणि चांदीची घसरण गुरुवारी थांबली. सलग तीन दिवस घसरण झाल्यानंतर सोने ४० रुपयांनी वधारून २५,६४० रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. सोन्याप्रमाणेच चांदीही ३५० रुपयांनी वधारून ३३,८५० रुपये प्रति किलो झाली.जवाहिऱ्यांनी केलेल्या खरेदीचा सोन्यावर चांगला परिणाम झाल्याचे सोने व्यापाऱ्यांनी सांगितले. अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदरात पाव टक्का वाढ केली, त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे भाव कोसळले. व्याजदर वाढीमुळे डॉलर वधारून सोन्यावर विपरीत परिणाम झाला. सिंगापुरात सोने ०.४ टक्क्यांनी घसरून १,०६६.५० अमेरिकी डॉलर प्रति औंसझाले.