नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात तेजी परतली. आज सोन्याचा भाव १०० रुपयांनी वधारून २६,५०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांकडून मागणी वधारल्याने चांदीचा भावही २०० रुपयांनी वाढून ३७,८०० रुपये प्रतिकिलो राहिला.सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, आभूषण निर्मात्यांची मागणी वधारल्याने सोन्याच्या भावात वाढ नोंदली गेली. यास जागतिक बाजारातील सकारात्मक धारणेची मदत झाली.न्यूयॉर्क येथे, सोन्याचा भाव ०.५८ टक्क्यांनी वाढून १,१८९.३० डॉलर आणि चांदीचा भावही १.४९ डॉलर प्रतिऔंस राहिला.तयार चांदीचा भाव २०० रुपयांनी वाढून ३७,८०० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ३६० रुपयांच्या तेजीसह ३७,७८० रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांनी उंचावून खरेदीसाठी ५६,००० रुपये व विक्रीकरिता ५७,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क) ४राजधानी दिल्लीच्या सराफ्यात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १०० रुपयांच्या तेजीसह २६,५५० रुपये व २६,४०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,६०० रुपयांवर कायम राहिला.
सोने-चांदीच्या भावात तेजी
By admin | Updated: March 24, 2015 23:41 IST