Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्या-चांदीच्या भावात सुधारणा

By admin | Updated: February 20, 2015 01:01 IST

लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या भावात गुरुवारी सुधारणा झाली. सोन्याचा भाव ९५ रुपयांनी वाढून २७,२८५ रुपये तोळा झाला.

नवी दिल्ली : लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या भावात गुरुवारी सुधारणा झाली. सोन्याचा भाव ९५ रुपयांनी वाढून २७,२८५ रुपये तोळा झाला. चांदीचा भाव २00 रुपयांनी वाढून ३७,४00 रुपये किलो झाला. सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 0.४ टक्क्याने वाढून १,२१७.७८ डॉलर प्रति औंस झाला. सोन्याचा भाव 0.८ टक्क्याने वाढून १६.६३ डॉलर प्रति औंस झाला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून इतक्यात व्याजदर वाढीची शक्यता नसल्याचे संकेत मिळाल्यामुळे जागतिक बाजारात सोन्या-चांदीचे भाव वाढले आहेत. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के शुद्धता तसेच ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव ९५ रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,२८५ रुपये आणि २७,0८५ रुपये तोळा झाला. काल सोने ५१0 रुपयांनी घसरले होते. ही या वर्षातील सर्वांत मोठी घसरण ठरली होती. सोन्याचा १0 ग्रॅमच्या गिन्नीचा भाव २३,७00 रुपये असा आदल्या दिवशीच्या पातळीवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव २00 रुपयांनी वाढून ३७,४00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव २२५ रुपयांनी वाढून ३६,८२५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव मात्र आदल्या दिवशीच्या पातळीवर खरेदीसाठी ६0 हजार रुपये आणि विक्रीसाठी ६१ हजार रुपये शेकडा असा कायम राहिला. जागतिक पातळीवरील तेजीचा लाभही सराफा बाजाराला मिळाला.आयात नियम शिथिल झाल्याने भाव वाढसोन्याच्या गिन्नीच्या (नाणे) आयातीवरील निर्बंध काल रिझर्व्ह बँकेने शिथिल केले. बँका आणि व्यापारी संस्थांना याचा लाभ मिळणार आहे. त्याचा परिणाम म्हणून आज सराफा बाजारात तेजीची लकाकी दिसून आली.