Join us

सोन्या-चांदीचे भाव वाढले

By admin | Updated: December 22, 2016 00:43 IST

सराफा बाजारातील दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला असून, राजधानी दिल्लीत सोने १00 रुपयांनी वाढून, २७,९५0 रुपये प्रति

नवी दिल्ली : सराफा बाजारातील दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला असून, राजधानी दिल्लीत सोने १00 रुपयांनी वाढून, २७,९५0 रुपये प्रति तोळा झाले. चांदीही ६५0 रुपयांनी वाढून ३९,६५0 रुपये किलो झाली. सिंगापूर येथील बाजारात सोने 0.३८ टक्क्यांनी वाढून १,१३६.४0 डॉलर प्रतिऔंस झाले. चांदी 0.४७ टक्क्यांनी वाढून १६.१५ डॉलर प्रतिऔंस झाली.