Join us

सोने-चांदी महागले!

By admin | Updated: November 20, 2015 01:54 IST

लागोपाठ दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव गुरुवारी १० ग्रॅममागे १५५ रुपये वधारून २५,७८० रुपये झाला. चांदीही किलोमागे १०० रुपयांनी वाढून ३४,२०० रुपयांवर गेली.

नवी दिल्ली : लागोपाठ दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव गुरुवारी १० ग्रॅममागे १५५ रुपये वधारून २५,७८० रुपये झाला. चांदीही किलोमागे १०० रुपयांनी वाढून ३४,२०० रुपयांवर गेली.लग्नसराईसाठी दागिने निर्मात्यांकडून मागणी वाढल्यामुळे व जागतिक बाजारातही सोन्याला मागणी असल्यामुळे त्याचे भाव वाढले. सिंगापूरच्या बाजारातील सोन्याच्या भावावरून देशातील सोन्याचा भाव सहसा निश्चित होतो. सिंगापूरमध्ये सोने औंसमागे ०.७ टक्क्याने वाढून १,०७८ अमेरिकन डॉलर झाले, तर चांदी औंसमागे १.१ टक्क्यांनी वधारून १४.३३ अमेरिकन डॉलर झाली. न्यूयॉर्कच्या बाजारात बुधवारी चांदी औंसमागे ०.०२ टक्का वाढून १,०७० अमेरिकन डॉलरवर गेली होती. दिल्लीतील सराफा बाजारात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धतेचे सोने १० ग्रॅममागे १५५ रुपयांनी वाढून अनुक्रमे ते २५,७८० व २५,६३० रुपये झाले.