Join us

सोने-चांदीच्या भावात घट

By admin | Updated: November 12, 2014 01:46 IST

आभूषण निर्माते व किरकोळ मागणीत घट झाल्याने सराफा बाजारात सोन्याचा भाव 345 रुपयांनी कोसळून 26,050 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर आभूषण निर्माते व किरकोळ मागणीत घट झाल्याने सराफा बाजारात सोन्याचा भाव 345 रुपयांनी कोसळून 26,050 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. औद्योगिक संस्थांद्वारे पुरेशी मागणी न मिळाल्याने चांदीचा भाव 35क् रुपयांच्या घसरणीसह 35,15क् रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.
बाजारातील सूत्रंनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचा भाव कोसळून चार वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेला. भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलर मजबूत झाल्याने सोन्याची मागणी घटली. सध्याच्या उच्च पातळीवर देशांतर्गत  किरकोळ मागणी कमी झाल्याने बाजार धारणोवर नकारात्मक परिणाम झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)