Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोने-चांदीचे भाव घसरले

By admin | Updated: July 15, 2014 02:20 IST

जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या उच्च पातळीवरील सोन्याचा भाव सोमवारी राजधानी दिल्लीच्या बाजारात २८० रुपयांनी कमी होऊन २८,४५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या उच्च पातळीवरील सोन्याचा भाव सोमवारी राजधानी दिल्लीच्या बाजारात २८० रुपयांनी कमी होऊन २८,४५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून मागणी कमी झाल्याने चांदीचा भावही ४०० रुपयांनी स्वस्त होऊन ४५,६०० रुपये प्रतिकिलो झाला.जागतिक बाजारात सोन्याचा भाव चार महिन्यांच्या उच्चांकी पातळीवरून खाली आला. यामुळे सोन्याच्या भावात घट नोंदली गेली. सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव १.६ टक्क्यांनी कमी होऊन १३१७.१२ डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भाव १.६ टक्क्यांनी घटून २१.०९ डॉलर प्रतिऔंसवर आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)