Join us

सोने-चांदीचे भाव किरकोळ घसरले

By admin | Updated: November 10, 2014 23:29 IST

जागतिक बाजारातील कमजोर मागणीमुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव 55 रुपयांनी घटून 26,395 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर मागणीमुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव 55 रुपयांनी घटून 26,395 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.  मागणीअभावी चांदीचा भावही 5क् रुपयांच्या किरकोळ घसरणीसह 35,5क्क् रुपये प्रतिकिलो राहिला.
अमेरिकेच्या कर्जात वाढ होण्याच्या शक्यतेने विदेशी बाजारात कमजोर कल दिसून आला. याचा सोने-चांदीच्या भावावर दबाव  राहिला. दिल्लीत 99.9 व 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 55 रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे 26,395 रुपये व 26,195 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव किरकोळ विक्रेत्यांच्या पाठबळाने 1क्क् रुपयांच्या तेजीसह 23,8क्क् रुपयांवर गेला.
 तयार चांदीचा भाव 5क् रुपयांनी घटून 35,5क्क् रुपये व साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव 23क् रुपयांच्या घसरणीसह 35,क्25 रुपये प्रतिकिलो झाला. दुसरीकडे चांदीच्या शिक्क्यांचा भाव 2,क्क्क् रुपयांच्या तेजीसह खरेदीसाठी 6क्,क्क्क् रुपये व विक्रीसाठी 61,क्क्क् रुपये प्रतिशेकडय़ावर राहिला.  (लोकमत न्यूज नेटवर्क)