Join us

सोने-चांदी सलग दुसऱ्या दिवशी घसरले

By admin | Updated: June 8, 2016 04:06 IST

सोन्याच्या भावात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. १0 रुपयांनी घसरलेले सोने २९,0३0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले.

नवी दिल्ली : सोन्याच्या भावात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. १0 रुपयांनी घसरलेले सोने २९,0३0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदीही ५0 रुपयांनी घसरून ३९,१५0 रुपये किलो झाली.दागिने निर्माते आणि ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने बाजारात घसरण झाली. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १0 रुपयांनी घसरून अनुक्रमे २९,0३0 रुपये आणि २८,८८0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. काल सोने १८५ रुपयांनी घसरले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २२,९00 रुपये असा स्थिर राहिला. दिल्लीत तयार चांदीचा भाव ५0 रुपयांनी घसरून ३९,१५0 रुपये किलो झाला.