Join us

सोन्या-चांदीने दिला शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा

By admin | Updated: April 20, 2016 03:16 IST

२0१६ मध्ये आतापर्यंत शेअर बाजाराच्या तुलनेत सोन्या-चांदीमधील गुंतवणुकीने अधिक परतावा दिला आहे. या वर्षात सोन्याच्या भावात १६.१८ टक्के, तर चांदीच्या भावात १५.६१ टक्के वाढ झाली

नवी दिल्ली : २0१६ मध्ये आतापर्यंत शेअर बाजाराच्या तुलनेत सोन्या-चांदीमधील गुंतवणुकीने अधिक परतावा दिला आहे. या वर्षात सोन्याच्या भावात १६.१८ टक्के, तर चांदीच्या भावात १५.६१ टक्के वाढ झाली आहे. त्याचवेळी ३0 कंपन्यांच्या सेन्सेक्समध्ये मात्र १.१५ टक्के घसरण झाली आहे.२९ फेब्रुवारी रोेजी सेन्सेक्स एक वर्षाच्या नीचांकावर २२,४९४.६१ अंकांवर गेला होता. सध्या त्यात वाढ झाली असली तरी ४ मार्च २0१५ च्या तुलनेत सेन्सेक्स आजही १४ टक्क्यांनी खाली आहे. ४ मार्च २0१५ रोजी सेन्सेक्स ३0,0२४.७४ अंकांवर होता. शेअर बाजार कमजोर झाल्यामुळे गुंतवणूकदार सोने आणि अन्य संपत्ती वर्गाकडे आकर्षित झाला आहे. गुंतवणूकदार सुरक्षेला नेहमीच प्राधान्य देत असतो. कच्च्या तेलाच्या किमतींतील चढ-उतार आणि चीनच्या अर्थव्यवस्थेसंबंधीच्या चिंता यामुळे शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पानंतर बाजारात थोडी सुधारणा झाल्यामुळे नुकसान थोडे भरून निघाले आहे.