नवी दिल्ली : विदेशी बाजारात कमजोर कल असतानाही दागिने निर्मात्यांनी खरेदीत हात ढिला सोडल्यामुळे राजधानी दिल्लीतील शेअर बाजारात सोमवारी तेजी दिसून आली. सोन्याचा भाव १0५ रुपयांनी वाढून २७,१८0 रुपये तोळा झाला. चांदीचा भाव १४0 रुपयांनी वाढून ३७,0५0 रुपये किलो झाला. औद्योगिक क्षेत्राकडून मागणी वाढल्याचा लाभ चांदीला झाला. सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव घसरून ११७७.५0 डॉलर प्रति औंस झाला. चांदीचा भाव घसरून १५.९८ डॉलर प्रति औंस झाला. दिल्लीत सोन्याचा भाव प्रत्येकी १0५ रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,१८0 रुपये व २७,0३0 रुपये तोळा झाला.
सोन्या-चांदीच्या भावात मजबुती
By admin | Updated: June 16, 2015 02:49 IST