नवी दिल्ली : सोन्याचा भाव सोमवारी दहा ग्रॅममागे ९०, तर चांदीचा किलोमागे १०० रुपयांनी खाली आला. सोने स्वस्त होऊन चार महिन्यांपूर्वीच्या भावावर म्हणजे २५,५२५ रुपये तोळा, तर चांदी ३४,००० रुपये किलोवर पोहोचली. जागतिक बाजारात आणि दागिने निर्मात्यांकडून मागणी घटल्यामुळे सोने सलग तिसऱ्या दिवशी खाली आले.सोन्याच्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय बाजारांत दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेत्यांकडूनही मागणी नसल्यामुळे सोन्याची चमक उतरली. राजधानी दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव दहा ग्रॅममागे ९० रुपयांनी खाली येऊन अनुक्रमे २५,५२५ व २५,३७५ रुपये झाला होता. गेल्या २१ जुलै रोजी सोन्याचा हा भाव होता. गेल्या दोन दिवसांत सोने २०५ रुपयांनी स्वस्त झाले. आठ ग्रॅमचे सोन्याचे नाणे १०० रुपयांनी वधारून २२,२०० रुपये झाले. तयार चांदीचा भाव १00 रुपयांनी घसरून ३४,000 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीची चांदी १२० रुपयांनी स्वस्त होऊन ३३,५८० रुपये किलो झाली. दरम्यान, चांदीच्या १०० नाण्यांचा भाव खरेदीसाठी ४८,००० व विक्रीसाठी ४९,००० रुपये असा स्थिर राहिला.
सोने-चांदीचा चार महिन्यांचा नीचांक
By admin | Updated: December 1, 2015 02:20 IST