Join us

सोने व चांदी १५० रुपयांनी स्वस्त

By admin | Updated: December 15, 2015 02:50 IST

सोन्याचा भाव सोमवारी १० ग्रॅममागे १५० रुपयांनी खाली येऊन २५,८५० रुपयांवर गेला. जागतिक बाजारात आणि दागिने निर्मात्यांकडून नसलेल्या मागणीमुळे सोने स्वस्त

नवी दिल्ली : सोन्याचा भाव सोमवारी १० ग्रॅममागे १५० रुपयांनी खाली येऊन २५,८५० रुपयांवर गेला. जागतिक बाजारात आणि दागिने निर्मात्यांकडून नसलेल्या मागणीमुळे सोने स्वस्त झाले. औद्योगिक क्षेत्रातून आणि नाणे निर्मात्यांकडून मागणी नसल्यामुळे चांदी किलोमागे १५० रुपयांनी खाली येऊन ३३,७०० रुपये झाली.अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करील अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा व देशात दागिने निर्माते व किरकोळ विक्रेत्यांकडून नसलेल्या मागणीचा परिणाम सोने स्वस्त होण्यावर झाला.सिंगापूरच्या बाजारात सोने औंसमागे ०.३ टक्क्यांनी खाली येऊन १,०७१.२५ अमेरिकन डॉलर झाले. राजधानी दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धतेचे सोने १० ग्रॅममागे १५० रुपयांनी स्वस्त होऊन अनुक्रमे २५,८५० व २५,७०० रुपये झाले. चांदीच्या १०० नाण्यांचा खरेदीचा भाव ४८,००० व विक्रीचा भाव ४९,००० रुपये असा आधीचाच राहिला.- शनिवारी सोन्याने २९० रुपयांची उडी घेतली होती. आठ गॅ्रमच्या सोन्याचा भाव २२,२०० रुपये असा स्थिर राहिला. तयार चांदी किलोमागे १५० रुपयांनी खाली येऊन ३३,७०० रुपये झाली, तर वीकली बेस्ड् डिलिव्हरीची चांदी किलोमागे १२५ रुपयांनी खाली येऊन ३३,८५५ रुपये झाली.