Join us

सोने पुन्हा २७ हजारांवर

By admin | Updated: September 2, 2015 00:09 IST

राजधानी दिल्लीत आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या बाजारात तेजी दिसून आली. सोन्याच्या दरात २०० रुपयांनी वाढ होऊन ते २७,०६० रुपयांपर्यंत पोहोचले

सराफा बाजार : सलग तिसऱ्या दिवशी तेजीनवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या बाजारात तेजी दिसून आली. सोन्याच्या दरात २०० रुपयांनी वाढ होऊन ते २७,०६० रुपयांपर्यंत पोहोचले. चांदी १५0 रुपयांनी वाढून ३५,१५0 रुपये किलो झाली.जागतिक पातळीवर सोने सिंगापुरात ०.७ टक्क्यांनी वाढून ११४२.७९ डॉलर प्रति औंस झाले, तर चांदीत ०.३ टक्क्यांनी वाढ होऊन १४.६७ डॉलर प्रति औंस इतकी झाली.नवी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुध्द सोन्याचे दर २०० रुपयांनी वाढले आहेत. ते अनुक्रमे २७,०६० रुपये आणि २६,९१० रुपये प्रति दहा ग्राम असे झाले आहेत. दोन दिवसांत बाजारपेठेत सोन्याचे दर २१० रुपयांनी वाढले आहेत, तर गिन्नीचे दर २२,५०० रुपये प्रति ८ ग्रॅमवर स्थिर आहेत.चांदीचे दर १५० रुपयांनी वाढून ३५,१५० रुपये प्रति किलो इतके झाले. साप्ताहिक डिलिव्हरीची किंमत २२० रुपयांनी वाढून ३४,५४५ रुपये प्रति किलो झाली. चांदीच्या शिक्क्याची खरेदी किंमत ५१,००० रुपये आणि विक्री किंमत ५२,००० रुपये प्रति शेकडा होती.