Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोने १० ग्रॅममागे ११० रुपयांनी स्वस्त

By admin | Updated: August 5, 2015 22:49 IST

अलंकार विक्रेत्यांकडून कमी झालेली मागणी आणि जागतिक बाजारातील सोन्याला आलेल्या मरगळीमुळे बुधवारी येथील बाजारात सोने १० ग्रॅ्रममागे ११० रुपयांनी

नवी दिल्ली : अलंकार विक्रेत्यांकडून कमी झालेली मागणी आणि जागतिक बाजारातील सोन्याला आलेल्या मरगळीमुळे बुधवारी येथील बाजारात सोने १० ग्रॅ्रममागे ११० रुपयांनी स्वस्त होऊन २५,०२० रुपयांवर आले.उद्योग क्षेत्र आणि नाणी निर्मात्यांकडून फारशी मागणी नसल्यामुळे चांदीचाही भाव किलोमागे ५० रुपये खाली येऊन ३३,७०० रुपयांवर आला. जागतिक पातळीवर सिंगापूरमध्ये सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी खाली येऊन प्रति औंस १,०८४.७० अमेरिकन डॉलरवर आला तर चांदी ०.३ टक्क्यांनी स्वस्त होऊन १४.५७ डॉलर औंस झाली. दागिने विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांकडूनही मागणी नसल्यामुळे बाजारपेठेत तेवढा उत्साह नव्हता. (वृत्तसंस्था)