Join us

वसुली वाढल्यास आणखी करकपात शक्य - गोयल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 03:08 IST

जीएसटी करदात्यांची संख्या व करवसुली वाढली तर दरांमध्ये आणखी कपात होऊ शकते, असे मत हंगामी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : जीएसटी करदात्यांची संख्या व करवसुली वाढली तर दरांमध्ये आणखी कपात होऊ शकते, असे मत हंगामी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. जीएसटीची सुधारणा विधेयके केंद्र सरकारने गुरुवारी लोकसभेत मांडली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.गोयल म्हणाले, जीएसटी परिषदेने मागील वर्षभरात ३८४ वस्तू व ६८ सेवांवरील दरात कपात केली. १८६ वस्तू व ९९ सेवांवरील जीएसटी रद्द केला. देशाची वित्तीय तूट जीडीपीच्या ३.५ टक्क्यांहून अधिक असू नये, हे सरकारचे लक्ष्य आहे. दरकपातीनंतरही वित्तीय तुटीच्या उद्दिष्टानुसार जीएसटीद्वारे अपेक्षित महसूल मिळत आहे. त्यामुळेच करदात्यांनी जीएसटीचे तंतोतंत पालन केल्यास आणखी दरकपात करणे शक्य असेल.

टॅग्स :पीयुष गोयल