नवी दिल्ली : मागच्या वर्षी डाळींचे भाव आकाशाला भिडल्याने वेळीच धडा घेत सरकारने खरीप हंगामादरम्यान उद्दिष्टापेक्षा डाळींची खरेदी अधिक केली आहे. शिलकी साठ्यासाठी ५०,००० टन डाळ खरेदीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते.आतापर्यंत ५१००० टन डाळ खरेदी करण्यात आली आहे. शिलकी साठ्यासाठी आता एक लाख टन आणि साठवणीसाठी सरकारने खरेदी संस्थांना मसूर, चना आणि अन्य डाळींची खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. विदेशातूनही ८५०० टन डाळ येत आहे.ग्राहक कल्याण विभागाचे सचिव सी. विश्वनाथ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आंतर-मंत्रालय समितीची बैठक झाली. यात आवश्यक वस्तुंचा पुरवठा आणि भाव याचा आढावा घेण्यात आला. बैठकीत टमाट्यांचे उत्पादन आणि दर याचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीला वाणिज्य मंत्रालय, एमएमटीसी, नाफेड आणि भारतीय अन्नधान्य महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डाळ खरेदीचे उद्दिष्ट ओलांडले
By admin | Updated: March 7, 2016 21:38 IST