सिंगापूर : तेलाची घटती मागणी आणि मुबलक पुरवठ्याबद्दल अमेरिका चिंतेत असताना गुरुवारी आशियातील बाजारपेठेत तेल आणखी स्वस्त झाले.अमेरिकेतील वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे (डब्ल्यूटीआय) तेल सकाळी ३७ सेंटस्ने घटून ४८.११ व ब्रेंट क्रूड तेल ५६ सेंटस्ने खाली येऊन ४८.१३ अमेरिकन डॉलरवर आले. गेल्या सहा वर्षांतील सर्वांत कमी किमतीवर तेल आल्यानंतर बुधवारी खरेदीदारांनी सौदे वाढविताच वेस्ट टेक्सास आणि ब्रेंट क्रूडचे तेलाचे करार २.५९ व २.१० अमेरिकन डॉलरने वधारले होते. प्रमुख उत्पादकांनी उत्पादन सध्याएवढेच ठेवण्याचे ठरविल्यामुळे बाजार लंगडतच चालणार असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घट
By admin | Updated: January 16, 2015 04:51 IST