Join us
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक तेजीत सोने-चांदीला झळाळी

By admin | Updated: June 14, 2014 04:54 IST

जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या बाजारात सोने-चांदीच्या भावाला नवी झळाळी मिळाली

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या बाजारात सोने-चांदीच्या भावाला नवी झळाळी मिळाली. शुक्रवारी सोन्याचा भाव स्टॉकिस्टांकडून मागणी वाढल्याने ३६० रुपयांनी वधारून २७,६०० रुपये प्रतिदहा ग्रॅम राहिला. औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून चांगली मागणी झाल्याने चांदीचा भाव ९०० रुपयांनी उंचावून ४२,१०० रुपये प्रतिकिलो झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक पातळीवर समभाग बाजारात घसरणीचा कल दिसून आला. परिणामी पर्यायी गुंतवणुकीसाठी सराफा बाजाराला कौल मिळाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)