Join us
Daily Top 2Weekly Top 5

२ लाख इंजिनिअर्सच्या नोकरीवर येणार गंडांतर

By admin | Updated: May 16, 2017 01:55 IST

बड्या आयटी कंपन्यांत येत्या १-२ वर्षांत नोकरकपात सुरू राहणार असून, या कंपन्या दरवर्षी सुमारे २ लाख इंजिनिअरांना कामावरून काढून टाकतील

नवी दिल्ली : बड्या आयटी कंपन्यांत येत्या १-२ वर्षांत नोकरकपात सुरू राहणार असून, या कंपन्या दरवर्षी सुमारे २ लाख इंजिनिअरांना कामावरून काढून टाकतील, असा अंदाज आहे. कंपन्यांकडून हजारो कर्मचाऱ्यांना गुलाबी चिठ्ठ्या (नोकरीवरून काढून टाकण्याच्या नोटिसा) वितरित केल्या जात आहेत. या कंपन्यांचा व्यवसाय असलेल्या अमेरिका, सिंगापूर, आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यासारख्या अनेक देशांनी संरक्षणवादी धोरण स्वीकारल्यामुळे कंपन्यांना नोकरकपात करावी लागत आहे. कॉग्निझंटने मात्र भारतात २० हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचे सांगितले. ही कंपनीही नोकरकपात करणार असल्याचे वृत्त होते. आम्ही नेहमीच कौशल्य विकासावर भर दिला असून, यंदा २००० कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.