Join us
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पैशांचा तपशील तपास संस्थांना द्या

By admin | Updated: September 6, 2016 05:17 IST

बेकायदेशीर मार्गांनी येणाऱ्या पैशाचा प्रवाह रोखण्यासाठी विशेष संस्थात्मकप्रणाली स्थापन करा

नवी दिल्ली : बेकायदेशीर मार्गांनी येणाऱ्या पैशाचा प्रवाह रोखण्यासाठी विशेष संस्थात्मकप्रणाली स्थापन करा, तसेच काळ्या पैशांसंबंधीची आकडेवारी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय थेट कर बोर्ड (सीबीडीटी) यांना उपलब्ध करून द्या, अशी सूचना विशेष तपासणी पथकाने (एसआयटी) रिझर्व्ह बँकेला केली. निवृत्त न्यायमूर्ती एम. बी. शाह यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने ११ आॅगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांना पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे की, काळ्या पैशाच्या समस्येचा निपटारा करण्यासाठी ‘डाटा वेअरहाऊस’ स्थापन करण्याची गरज आहे. सर्व तपासी संस्था या वेअरहाऊसमधून आपल्याला हवी ती आकडेवारी घेऊ शकतील. देशातील नियामकीय संस्थांमध्ये माहितीच्या देवाणघेवाणीबाबत मोठी दरी आहे. ती दूर करण्यात डाटा वेअरहाऊसची मदत होईल. रिझर्व्ह बँकेकडे उपलब्ध असलेल्या माहितीची अन्य तपासी संस्थांकडून खातरजमा करून घेता येऊ शकेल. त्यातून बेकायदेशीर वित्त प्रवाह रोखण्यास मदत होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)