Join us  

आजच करा ‘केवायसी’ अपडेट; अन्यथा बंद हाेईल डिमॅट खाते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 8:46 AM

KYC update: तुमच्याकडे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाैंट असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. डिमॅट आणि ट्रेडिंग खातेदारांना ३१ जुलैपर्यंत केवायसी डिटेल्स अपडेट करण्याच्या सूचना डिपाॅझिटरीकडून देण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली : तुमच्याकडे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाैंट असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. डिमॅट आणि ट्रेडिंग खातेदारांना ३१ जुलैपर्यंत केवायसी डिटेल्स अपडेट करण्याच्या सूचना डिपाॅझिटरीकडून देण्यात आल्या आहेत. तसे न केल्यास खाते डिॲक्टिव्हेट करण्यात येईल. नॅशनल सिक्याेरिटीज डिपाॅझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपाॅझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडने (सीडीएसएल) यावर्षी एप्रिलमध्ये सूचना जारी केल्या हाेत्या. त्यानुसार कार्यवाही करणे गरजेचे आहे.

टॅग्स :बँकिंग क्षेत्र