Join us  

जिओफोनला टक्कर? इंटेक्सने लाँच केले 700 ते 1500 रूपयांचे 4G मोबाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2017 11:02 AM

इंटेक्स कंपनीने मंगळवारी भारतात पहिला 4G VoLTE फीचर फोन लॉन्च केला आहे.

ठळक मुद्देइंटेक्स कंपनीने मंगळवारी भारतात पहिला 4G VoLTE फीचर फोन लॉन्च केला आहे.  इनटेक्स   टर्बो+ 4G असं या फोनचं नाव असून कंपनीच्या नवरत्न सीरिजच्या अंतर्गत हा नवा फोन आला आहे. याच सीरिजमध्ये इतर 8 फोनही आहेत ज्यांची किंमत 700 रूपयांपासून ते 1500 रूपयांपर्यंत आहे.  

मुंबई, दि. 2- इंटेक्स कंपनीने मंगळवारी भारतात पहिला 4G VoLTE फीचर फोन लॉन्च केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओच्या फुकटात मिळणाऱ्या फोनची घोषणा केल्यानंतर इंटेक्सकडून या फोनची घोषणा करण्यात आली होती.  इनटेक्स   टर्बो+ 4G असं या फोनचं नाव असून कंपनीच्या नवरत्न सीरिजच्या अंतर्गत हा नवा फोन आला आहे. याच सीरिजमध्ये इतर 8 फोनही आहेत ज्यांची किंमत 700 रूपयांपासून ते 1500 रूपयांपर्यंत आहे.  

इंटेक्स टर्बो+ 4G फोनमध्ये 2.4 इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. फोनमध्ये ड्युएल प्रोसेसरसोबत 512 एमबी रॅम आणि 4जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे जो 32 जीबीपर्यंत वाढवता येईल. या 4G फोनमध्ये 2 मेगपिक्सल बॅक कॅमेरा असून फ्रंट कॅमेरा व्हीजीए आहे. तसंच फोनची बॅटरी 2000 मिलीअँपिअर इतकी आहे. इंटेक्स टर्बो+ 4G या फोन व्यतिरिक्त इंटेक्सने इतर तीन फीचर फोन ECO सीरिजमध्ये लाँच केले आहेत. ECO  102+, ECO 106+ आणि ECO सेल्फी हे तीन फोन लॉन्च करण्यात आले आहेत. या तीनही फोनमध्ये 1.8 इंचाचा डिप्ले असून 800 मिलीअँपिअर ते 1800 मिलीअँपिअर इतकी बॅटरी आहे. तसंच फोनमध्ये मल्टी लॅन्ग्वेज सपोर्ट आणि जीपीआरएसची सुविधाही देण्यात आली आहे. 

टर्बो सीरिजमध्ये इन्टेक्सने दोन फीचर फोन लॉन्च केले आहेत. टर्बो शाइन आणि टर्बो सेल्फी 18 या दोन नव्या फोनमध्ये 2.4 इंचाचा डिस्पे आहे. टर्बो शाइन या फोनमध्ये 22 भारतीय भाषांचा समावेश आहे. फोनमध्ये 1400 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी, वायरलेस एफएम असून फोनमध्ये 32 जीबी एक्सपांडेबल मेमरी आहे. तर टर्बो सेल्फी 18मध्ये 1800mAH बॅटरी असून फ्रंट आणि बॅक कॅमेरा आहे. अल्ट्रा सीरिजमध्ये इंटेक्सने अल्ट्रा 2400+ आणि अल्ट्रा सेल्फी फीचर फोन आणला आहे. त्याचा डिसप्ले क्रमशः 2.4 इंच आणि 2.8 इंत आहे. तर फोनमध्ये 2400 मिलीअँपिअर आणि 3000 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. 

याशिवाय इंटेक्सने लायन्स G10 फीचर फोनही बाजारात आणला आहे. या फोनचा 2.4 इंचाचा डिस्प्ले अशून 145 मिलीअँपिअर बॅटरीची क्षमता आहे. तसंच 64 जीबी पर्यंत एक्सापांडेबल मेमरी देण्यात आली आहे.