Join us
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्य विम्याचा हिस्सा १६ टक्के वाढला

By admin | Updated: May 29, 2017 00:49 IST

सर्वसामान्य विमा (जनरल इन्शुरन्स) उद्योगाचा हिस्सा या वर्षी एप्रिल महिन्यात ग्रॉस रिटर्न प्रीमियममध्ये (जीडब्ल्यूपी) १६ टक्के वाढून

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्वसामान्य विमा (जनरल इन्शुरन्स) उद्योगाचा हिस्सा या वर्षी एप्रिल महिन्यात ग्रॉस रिटर्न प्रीमियममध्ये (जीडब्ल्यूपी) १६ टक्के वाढून १२ हजार २०६ कोटी रुपयांवर गेला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हा हिस्सा १० हजार ५०० कोटी रुपये होता. २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात जनरल इन्शुरन्सची जीडब्ल्यूपीमध्ये वाढ ३० टक्के झाली होती. एप्रिल महिन्याच्या आकडेवारीत पीकविमा विभागाचा समावेश नाही. पीकविम्याने आर्थिक वर्ष २०१६-२०१७ मध्ये जवळपास १८ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाची भर घातली. चालू आर्थिक वर्षात पीकविम्याला खरिपाच्या पेरणीनंतर प्रारंभ होईल.