Join us  

Gautam Adani: अदानी ग्रुपच्या 'या' कंपनीच नाव बदलू शकतं; जाणून घ्या नाव बदलल्यानंतर काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 1:54 PM

Adani Group: गौतम अदानी यांच्या अदानी ट्रान्समिशन या कंपनीच नाव आता अदानी एनर्जी सोल्युशन होऊ शकते.

या वर्षीच्या सुरुवातीपासून अदानी समुह मोठ्या तोट्यात गेल्याचे समोर आले आहे. अदानी समुहाविरोधात अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने आरोप केले. त्यामुळे अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घट झाली. आता या अहवालाचा प्रभाव कमी झाला असून सोमवारी अदानी ट्रान्समिशनचे चौथ्या तिमाहीत शेअर्सने भरारी घेतली आहे. ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने ८५ टक्के नफा कमावला आहे. निकाल जाहीर करण्यासोबतच अदानी ट्रान्समिशनचे नाव बदलता येईल, असे कंपनीच्या वतीने स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

नियामक फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गौतम अदानी यांच्या कंपनी अदानी ट्रान्समिशनचे नवीन नाव अदानी एनर्जी सोल्युशन्स असू शकते. उत्कृष्ट त्रैमासिक निकाल सादर करणाऱ्या या कंपनीच्या संचालक मंडळाने नाव बदलण्याच्या अदानींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. निव्वळ नफा झाला ४४० कोटी रुपये झाल आहे. कंपनीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, अदानी ट्रान्समिशनची आर्थिक स्थिती चांगली आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ८५ टक्क्यांनी वाढून ४४० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 

वर्षभरापूर्वी याच काळात हा आकडा २३७ कोटी रुपये होता. यासह, या कालावधीत कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न ३,४९५ कोटी रुपये आहे, जे १० टक्क्यांनी वाढले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत ३,१६५ कोटी रुपये होते.

IPL हिरो शुबमन गिलला ४० लाखांच्या रक्कमेवर १२ लाख रुपये कर भरावा लागणार?

वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत १७ टक्केंनी वाढून ३,०३१ रुपये झाली आहे. एक वर्षापूर्वी चोथ्या तिमाहीत २,५५६ कोटी रुपये होती. कंपनीचा EBITDA २८ टक्के वाढला आणि १,५७० कोटी रुपये झाला आहे. कमर्शिअल आणि औद्योगिक सेक्टरमध्ये वाढ झाली, वित्त वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत उर्जेच्या मागणीत झाली आहे.

टॅग्स :गौतम अदानीव्यवसाय