Join us

कराड दक्षिण मतदारसंघातील रहिवाशांचा मेळावा

By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST

नवी मुंबई : कराड दक्षिण मतदारसंघातील रहिवाशांचा मेळावा रविवारी नवी मुंबईत आयोजीत करण्यात आला आहे. या मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांना उमेदवारी दिली तरी विद्यमान आमदार विलासकाका पाटील उंडाळकर निवडणूक लढविण्याची घोषणा करणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यातील सर्वांचे लक्ष कराड दक्षीण मतदारसंघावर केंद्रीत झाले आहे. या मतदारसंघातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतू काँगे्रसचे विद्यमान आमदार विलासकाका पाटील उंडाळकर ७ वेळा या मतदार संघातून निवडून आले आहेत. यापूर्वी विधी व न्याय मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मुख्यमंत्र्यांना उमेदवारी दिली, तरी त्यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. यासाठी मुंबईतील रहिवाशांचा मेळावा नवी मुंबईतील माथाडी भवनमध्ये सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या वेळी आमदार नरेंद्र पाटील, नवी मुंबईतील नगरसेवक संपत शेवाळे यांचा सत्कार होणार आहे. मेळावा यशस्वी करून मुख्यमंत्र्यांना शह देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्यामुळे, याकडे सर्वांचे लक्ष लागलेआहे.