Join us
Daily Top 2Weekly Top 5

जी. के. उपाध्याय टेलीकॉम सर्कलचे महाव्यवस्थापक

By admin | Updated: March 30, 2015 02:48 IST

महाराष्ट्र टेलीकॉम सर्कलच्या मुख्य महाव्यवस्थापकपदी जी. के. उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १५ आॅक्टोबर १९५७ साली उपाध्याय यांचा जन्म झाला

मुंबई : महाराष्ट्र टेलीकॉम सर्कलच्या मुख्य महाव्यवस्थापकपदी जी. के. उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १५ आॅक्टोबर १९५७ साली उपाध्याय यांचा जन्म झाला. आयआयटी रुडकीमधून त्यांनी बी़टेक केले. इंडियन टेलीकॉन सर्व्हिसच्या १९७८ बॅचचे ते अधिकारी आहेत. १९८० साली आयटीएस अधिकारी होते. १९८२ ते १९७९ दरम्यान त्यांनी कानपूर, अलाहबाद, लखनऊ येथे काम केले. १९९७ साली पाच वर्षांसाठी प्रकल्प संचालक म्हणून दक्षिण अफ्रिका आणि ओमान येथे काम केले. गोध्रा, गाझियाबाद, मेरठ आणि मिझोराम येथे टेलीकॉम महाव्यवस्थापक म्हणून काम पाहिल्यानंतर २०१२ साली त्यांच्यावर हरियाणा सर्कलच्या मुख्य महाव्यवस्थापक पदाची धुरा सोपविण्यात आली होती. (वाणिज्य प्रतिनिधी)