Join us
Daily Top 2Weekly Top 5

समभाग निगडित फंड खाती ८ लाखांनी वाढली

By admin | Updated: August 16, 2016 01:02 IST

किरकोळ गुंतवणूकदारांच्या प्रतिसादाच्या जोरावर समभाग निगडित म्युच्युअल फंडांची खाती गेल्या चार महिन्यांत तब्बल ८ लाखांनी वाढली आहेत. एकूण खात्यांची संख्या विक्रमी

नवी दिल्ली : किरकोळ गुंतवणूकदारांच्या प्रतिसादाच्या जोरावर समभाग निगडित म्युच्युअल फंडांची खाती गेल्या चार महिन्यांत तब्बल ८ लाखांनी वाढली आहेत. एकूण खात्यांची संख्या विक्रमी अशा ४.९२ कोटींवर यंदा पोहोचली आहे.एप्रिल ते जुलै या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार म्ािहन्यांत ८.२१ लाखांनी समभाग निगडित फंड खाती वाढली आहेत. ती संख्या जुलैअखेर ३.६८ कोटी झाली आहेत.गेल्या सलग दोन आर्थिक वर्षांपासून फंड खाती वाढत असून २०१४-१५ मध्ये ती २५ लाख तर २०१५-१६ मध्ये ती ४३ लाखांनी वाढली आहेत. देशातील छोट्या शहरांमधून गुंतवणूकदार समभाग निगडित फंडांकडे वळत असल्याचा हा परिणाम मानला जात आहे. समभाग निगडित फंड योजनांमध्ये गुंतवणूकदारांचा निधी वाढत असून त्यामुळे हा फंड प्रकारदेखील अधिक लोकप्रिय होत असल्याचे निरीक्षण विश्लेषकांनी नोंदविले आहे.भांडवली बाजार नियामक सेबीचे नियंत्रण असलेल्या सर्वोच्च संस्थेच्या माहितीनुसार, विविध ४२ फंड घराण्यांमार्फत समभाग निगडित फंड खाती जुलै २०१६ अखेर ३ कोटी ६८ लाख ४६,७४३ झाली आहेत. त्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ३ कोटी ६० लाख २५ हजार ६२ फंड खात्यांच्या तुलनेत यंदा ८.२१ लाख खात्यांची भर पडली आहे. (वृत्तसंस्था)एप्रिल ते जुलै २०१६ दरम्यान केवळ समभाग निगडित फंडांमधील गुंतवणूक १२ हजार कोटी रु पये आहे. तर या दरम्यान मुंबई निर्देशांक (सेन्सेक्स) ३.७ टक्क्यांनी उंचावला आहे.म्युच्युअल फंड हे विविध पर्यायांतील गुंतवणुकीचे माध्यम आहे. समभाग तसेच रोखे, सोने आदी प्रकारांमध्ये याद्वारे गुंतवणूक केली जाते.