Join us

इंधन दरात तिसऱ्या दिवशी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 06:44 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आणखी उतरल्यामुळे शनिवारी भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिस-या दिवशीही कपात केली.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आणखी उतरल्यामुळे शनिवारी भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिस-या दिवशीही कपात केली.त्यामुळे आज मुंबईमध्ये पेट्रोल ३८ पैशांच्या कपातीनंतर ८७.४६ रुपये लीटर, तर डिझेल १३ पैशांच्या कपातीनंतर ७९ रुपये लीटर झाले. दिल्लीत पेट्रोल ८१.९९ रुपये लीटर तर डिझेल ७५.३६ रुपये लीटर झाले. दिल्लीमध्ये अनुक्रमे ३९ व १४ पैसे कपात करण्यात आली.