Join us

सेबीच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 05:14 IST

इन्व्हेस्ट अ‍ॅक्शन फोरम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पॅन कार्ड क्लब कंपनीने ५१ लाख गुंतवणूकदारांचे पैसे बुडविले. हे पैसे व्याजासहीत परत मिळावेत, यासाठी वांद्रे-कुर्ला संकुल येथील सेबी कार्यालयाच्या मैदानात बुधवारी निवेदन रॅली काढण्यात आली.

मुंबई : इन्व्हेस्ट अ‍ॅक्शन फोरम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पॅन कार्ड क्लब कंपनीने ५१ लाख गुंतवणूकदारांचे पैसे बुडविले. हे पैसे व्याजासहीत परत मिळावेत, यासाठी वांद्रे-कुर्ला संकुल येथील सेबी कार्यालयाच्या मैदानात बुधवारी निवेदन रॅली काढण्यात आली. या वेळी मुंबई आणि राज्यासह दहा हजार गुंतवणूकदार एकाच छताखाली एकवटले होते. पॅन कार्ड क्लब कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे व्याज आणि मुद्दलासह परत करावे, असे म्हणणे आंदोलनकर्त्यांनी मांडले.पॅन कार्ड क्लब कंपनी बंद केल्यावर गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी १२ मे २०१७ रोजी ५१ लाख गुंतवणूकदारांचे ७ हजार ३५ कोटी रुपये देण्यात यावे, असे सेबीने सांगितले होते, परंतु अद्यापही पैसे परत मिळाले नाहीत. परिणामी, बुधवारी सर्व गुंतवणूकदार अर्ज घेऊन सेबीकडे आले होते. मात्र, सेबीचे अध्यक्ष अनिल त्यागी हे गुंतवणूकदारांकडे दुर्लक्ष करत आहेत. गुंतवणूकदार सेबीला ५० हजार अर्ज देण्यासाठी आले होते.