Join us

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

अहमदनगर : स्व. सुंदरबाई कन्हैय्यालाल शिंगवी सेवाभावी प्रतिष्ठाण, शिंगवी चष्माघर व एम. व्ही. देसाई आय हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने १८१ व्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दि. १५ रोजी स. ११ वा. जामखेड येथे करण्यात आले आहे.

मोफत कॉम्प्युटरव्दारे तपासणी, मोफत लेन्स टाकून शस्त्रक्रिया, मोफत काळा चष्मा, औषधोपचार व जामखेड ते पुणे येण्या-जाण्याचा मोफत प्रवास शिवाय या शिबिरामध्ये नामवंत नेत्रतज्ञ रुग्णांची नेत्रतपासणी करून उपचार व शस्त्रक्रिया करणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक शिंगवी यांनी दिली. यासाठी शिंगवी चष्माघर येथे नावनोंदणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.